नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ – माथेरान ट्रॅक्सी स्टँड येथील स्लॅप ड्रेन बांधकाम व परिसरातील सुशोभीकरण तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे गावातील उल्हास नदी पात्रातील पांडव कालीन शिवलिंग परिसरातील घाट विकसीत व सांस्कृतिक केंद्राचे ग्रामीण कोकण पर्यटना विकासा अंतर्गत मंजूर निधीतून पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर व कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांचे हस्ते भूमीपूजन सोहळा पार पडला.
भारतीय जनता पार्टीचे कर्जत – खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे व भारतीय जनाला पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांचे प्रयत्नातून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ – माथेरान ट्रॅक्सी स्टँड येथील स्लॅप ड्रेन बांधकाम व परिसरातील सुशोभीकरण तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे गावातील उल्हास नदी पात्रातील पांडव कालीन शिवलिंग परिसरातील घाट विकसीत व सांस्कृतिक केंद्राचे ग्रामीण कोकण पर्यटन विकासा अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामाचे भूमीपूजन हे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि. ९ एप्रिल २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीचे पनवेल विधान सभेचे आमदार प्रशांत ठाकूर व नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले कर्जत – रवालापूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड यांचे हास्ते भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, कर्जत – खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, दिपक बेहरे, कर्जत पंचायत समिती माजी सदस्य नरेश मसणे, शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रसाद थोरवे, अंकुश दाबणे यांच्यासह भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी व नेरळ ट्रॅक्सी चालक मालक संघटनेचे मान्यवर व पदाधिकारी, सदस्य तसेच कोल्हारे गावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.