नाभिक महिला समाज संघाचं हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरं

नाभिक महिला समाज संघाचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा
नागोठणे ( महेंद्र माने) :
नाभिक महिला समाज संघाचे हळदी कुंकू समारंभ मंगळवार 04 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कल्पना टके, विजया चव्हाण, मिनल गुजर, नम्रता माने, कल्पना अयाप्पा, दर्शना दिवेकर,ऋतिका साळुंखे, प्रगती जाधव, सेजल खराडे, हर्षदा साळुंखे, यांच्यासह संघाच्या सदस्या भगिनी उपस्थित होत्या.
महिलांचा जिव्हाळ्याचा असलेले हा हळदी कुंकू समारंभ नागोठणे येथील नम्रता माने यांच्या बिल्डींगच्या टेरेसवर साजरा करण्यात आला. यावेळी सर्वत्र रांगोळी काढून साजरा करीत असलेल्या कार्यक्रमात नटून थटून एकत्र आलेल्या सर्व महिलांनी सौभाग्याचे वाण लुटून एकमेकांना हळदी कुंकू लावून तीळगूळ वाटप करीत विचारांचे देवाण घेवाण केली.
या वेळी सर्व महिलांनी मोठ्या उत्साहात ऊखाण्यात नावे घेणे, गप्पा गोष्टी, विविध कार्यक्रम तसेच नृत्य सादर करून मौज मस्ती करीत आपला आनंद व्यक्त केला. उपस्थितांचे आभार कल्पना टके व नम्रता माने यांनी मानले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेजल खराडे व प्रगती जाधव यांनी अपार मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *