नागोठणे ( महेंद्र माने ) : ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात श्री रामचंद्रांच्या आयोध्येतील नवनिर्माण मंदिराच्या वतीने नागोठणे विभागासाठी अभिमंत्रित निमंत्रण अक्षता रविवार 31 डीसेंबर रोजी आणण्यात आले.
यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक,शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा कारसेवक किशोर जैन,देवस्थान ट्रस्टचे सचिव दिलीप टके, मनसे नेते तथा कारसेवक गोवर्धन पोलसानी, पोलिस निरीक्षक संदिप पोमन, मा.सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, मा.सरपंच विलास चौलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात आरती करून अक्षता वाहून कलश यात्रा नागोठणे नगरीत काढण्यात आली.
आयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रजी यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत असल्याच्या अनुषंगाने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या नगरीतुन अभिमंत्रित आलेल्या अक्षता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात वाहिल्यानंतर आरती करून जय श्रीराम, पवन पुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, च्या गजरात निघालेली कलश यात्रा श्री जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत,छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा समाज मंदिर,हनुमान मंदिर छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ मार्गे जैन मंदिरात आल्यानंतर यात्रेचे आचार्य भगवंत श्री देवकीर्तिसुरिश्वरजी महाराज,प.पू.पंन्यास श्री रत्नकीर्ति, प.पू. साध्विजी भगवंत प्रसन्नवर्धनाश्री या स्वामीजींनी कलश यात्रेचे स्वागत करून उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर कलश यात्रा केएमजी विभागातील राधाकृष्ण मंदिर,कानिफनाथ मठ,गणपती,हनुमान मंदिर, आंगर आळी हनुमान मंदिर,खडक आळी श्री स्वामी समर्थ मठ मार्गे नवीन रामेश्वर मंदिरात कलश यात्रेची सांगता करण्यात आली.
सदरील कलश यात्रेला नागोठणे नगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कळशाचे ठिकठिकाणी रांगोळी काढून पूजन करून जोरदार स्वागत करण्यात आले. या कलश यात्रेत ग्रा.पं.सदस्या- सुप्रिया काकडे व भाविका गिजे,भाजप जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, भाजप ता.सरचिटणीस आनंद लाड व एकनाथ ठाकूर, भाजपा मा. जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, भाजप शहर अध्यक्ष सचिन मोदी, मनोज धात्रक, हभप बापुमहाराज रावकर, विवेक रावकर, सुरेश जैन, शंकर ठाकूर, धनराज उमाळे, तिरत पोलसानी, प्रवीण ताडकर,शेखर गोळे, चेतन कामथे, उदंड रावकर, रोहिदास हातनोलकर, नितीन राऊत, केदार कुंटे, महादेवसिंग परदेशी, नामदेव नाईक, सुभाष जैन, संजय नांगरे, भरत गिजे, यांच्यासह नागोठणे नगरीतील महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदरील अक्षता कलश यात्रा यशस्वीपणे राबविण्यासाठी संदिप राठोड, मंदार परांजपे, उपखंड प्रमुख कैलाससिंग परदेशी, कार्यवाहक मयूर वाघमारे यांनी विशेष परीश्रम घेतली.