खांब देवकान्हे विभागात ग्राम दैवत बैसले घटी; नवरात्रौत्सवास प्रारंभ, विविध उपक्रमातून उत्सव साजरा करण्याची परंपरा

खांब देवकान्हे विभागात गावचे ग्राम दैवत बैसले घटी; नवरात्रौत्सवास प्रारंभ, विविध उपक्रमातून उत्सव साजरा करण्याची परंपरा
कोलाड (श्याम लोखंडे) :
संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा नवरात्रोत्सवास सोमवारी 22 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात गावोगावी ग्रामदैत तसेच भाविकीचे कुलदैवत घटी बैसले आहेत यानिमित्त या परिसरात विविध गावांमध्ये घटस्थापना आणि देवी प्रतिष्ठापना करण्यात आली असून नवरात्रीचा पवित्र माहोल, जागरांचे सूर आणि भक्तांचा उत्साह यामुळे हा परिसर धार्मिक तथा आध्यात्मिक भक्तीरसात तल्लीन झाला आहे.
गावोगावचे ग्रामदैवत खांब येथील खांबजाई माता, नडवली,तळवली, धानकान्हे, देवकान्हे,बाहे, गावाची गावदेवी माता,चिल्हे गावचे आराध्य ग्राम दैवत श्री धाक्सूद महाराज,भैरवनाथ व देवी जोगेश्वरी माता आई चिल्लाई माता, बजरंगबली हनुमान देव देवतांचे विविध रूपांचे नवरात्रोत्सवाचेही शानदार नियोजन आयोजन स्थानिक पातळीवर ग्रामस्थ नागरिक युवक महिला मंडळ यांच्या वतीने त्या त्या गावात करण्यात आले आहे. सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळपासून घटस्थापना म्हणून भावकी, गावकीचे लोकांची धावपळ सुरू होती. गावागावात भावकीचे कुलदैवताचे घाटस्थापना केल्यानंतर गावचे ग्राम दैवत घटी बसविण्याची परंपरा आहे.
या दिवसांत देव देवींना मुखवटे, दागदागिने तसेच रंगीत वस्त्र चढविले जातात.मंदिर परिसर कणा रांगोळी, फुलांनी सजवून मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघालेले आहेत.तर दररोज सकाळी सायंकाळी सामुयिक महा आरती, सायंकाळी हरिपाठ,रात्री १० ते १२ दरम्यान दररोज विविध -भागांतील भजन मंडळांकडून भजन, धार्मिक कार्यकम तसेच युवकांचे विविध कार्यक्रम या माध्यमातून दांडिया खेळ असे विविध उपक्रम सादर केले जाणार आहेत. प्रत्येक दिवशी विविध जागरपाळीचे विशेष आयोजन गावागावातून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच सदरच्या या उत्सवात गावोगावचे ग्राम दैवत तसेच देवी माता घटी प्राणप्रतिष्ठापना केली जाते. इतर ठिकाणी घट पूजन किंवा देवीच्या फोटोची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केले जाते. यात प्रामुख्याने दांडिया गरबा, हरिपाठ, भजन, जागर धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम तसेच युवा मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, शैक्षणिक,कला,क्रीडा, असे उपक्रमाचे कार्यकाम युवा, युवती यांच्यासाठी तसेच विशेषतः महिलांसाठी देखील विविध स्पर्धांचे तसेच व्याख्यानमाला असे कार्यक्रम या कालावधीत मोठ्या भक्ती भावाने साजरे करण्यात येतात.
या भक्तिभावाने साजरा होणाऱ्या या उत्सवात कोलाड पोलीस प्रशासनाकडून देखील कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त त्यांच्या मदतीने नजर ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *