क्रिकेट विकसित झाले; आता पोलादपूरसाठी सुसज्ज क्रीडांगण द्या – ‘बिग बॅश लिग 26’ऑक्शनप्रसंगी पत्रकार पालकर यांची मागणी

Palkar cricket opening
पोलादपूर | प्रतिनिधी 
11 रूपये प्रवेशशुल्कापासून कोंबडया आणि बोकड-मेंढे अशी बक्षिसे दिल्याच्या बातम्या प्रसिध्द केल्यानंतर आता क्रिकेट खेळाडूंना व्यावसायिक पध्दतीने बोली लावली जात असल्याने क्रिकेटमधून कमाईचे साधनही उपलब्ध झाले आहे. क्रिकेट विकसित झाले; आता पोलादपूरसाठी सुसज्ज क्रीडांगण द्या, अशी मागणी पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी शहराचे राजकारण करणाऱ्या सर्वपक्षियांकडे केली.
याप्रसंगी पोलादपूर प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्यासह नगराध्यक्षा स्नेहल मेहता, नगरसेविका श्रावणी शहा, ऍड.सचिन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सारिका विचारे, पोलादपूर शहर क्रिकेट संघटनचे अध्यक्ष दर्पण दरेकर तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ संदीप कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार पालकर यांच्याहस्ते छ.शिवरायांच्या अर्धपुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर नगरसेविका श्रावणी शहा यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्षा स्नेहल मेहता यांनी पोलादपूरवासियांनी प्लास्टीकमुक्त पोलादपूर अभियानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. यावेळी नामवंत क्रिकेटपटू संदीप कदम यांनी पोलादपूरच्या खेळाडूंचा खेळ अधिक विकसित होण्यासाठी सध्या भैरवनाथनगर सहाणेचे मैदान वानखेडे स्टेडियमसारखे उपयुक्त वाटत असले तरी जोपर्यंत वजनदार चेंडूचा वापर क्रिकेटपटूंकडून केला जात नाही तोपर्यंत जिल्ह्यात राज्यात त्यांचे नाव मोठे होणार नसल्याने मोठया मैदानाची निश्चितच गरज असल्याचे सांगितले.
यावेळी विरेश 11, स्वरा-विरा 11, सावित्री ग्रुप जोगेश्वरी गाडीतळ, भाई भाई ब्रदर, स्व. राजुदादा पालकर आनंदनगर, विनोद राजा फायटर, महाकाल वॉरियर्स, श्री छत्रपती शिवाजी नगर पोलादपूर, भैरव 11, नामदार प्रविणभाऊ दरेकर मित्र मंडळ, श्री कालभैरवनाथ प्रसन्न मठगल्ली, दोस्ती 11 या संघांच्या मालकांनी खेळाडूंची बोली लावत संघरचना केली.
पोलादपूर शहरात प्रथमच पोलादपूर मित्र मंडळातर्फे दि. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या दोन दिवशी ‘बिग बॅश लिग 26’ अंतर्गत 1 लाख 1 रूपये आणि आकर्षक चषक, 50 हजार 1 रूपये आणि आकर्षक चषक, 30 हजार 1 रूपये आणि आकर्षक चषक तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिके असलेल्या क्रिकेटस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सनी विचारे, महेश निकम, अमर नगरकर, प्रतिक सुर्वे, अरविंद सुतार तसेच अन्य कार्यकर्ते क्रिकेटपटूंचा लिलाव यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *