कोर्लई समुद्रात पाकिस्तानी नावाच्या संशयीत बोटीचा गूढ प्रकार, रायगड पोलिसांची मुसंडी कारवाई!

Korlai boat search1

अलिबाग (अमुलकुमार जैन) :
06 जुलै 2025 रोजी रात्री 8.52 वाजता भारतीय तटरक्षक दल, मुरूड यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्यापासून सुमारे 2.5-3 नॉटिकल मैलांवरील समुद्रात ‘Muqadar Boya 99’ नावाची MMSI-463800411 क्रमांकाची संशयीत पाकिस्तानी बोट दिसल्याची माहिती मिळाली. याबाबत त्वरित अलर्ट जारी करत रायगड पोलीस दलाकडून तात्काळ उच्चस्तरीय प्रतिसाद देण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, SDPO व स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले.
या संदर्भात रायगड पोलिसांनी 19 ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी, सागरी किनाऱ्यावरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉजेस आणि होम स्टे यांची तपासणी, तसेच जलद प्रतिसाद पथक व BDS तुकड्या कोर्लई, रेवदंडा, साळाव परिसरात गस्तीसाठी पाठवण्यात आल्या. स्थानिक मच्छीमार, सागररक्षक दल, भारतीय नौदल व तटरक्षक दल यांच्यासह संयुक्त शोधमोहीम राबवून समुद्रात बोट व संशयीत वस्तू शोधल्या गेल्या. यामध्ये ड्रोन तपासणी, GPS फ्लोटर यंत्रणा तपासण्यात आली.
तपासणीत आढळून आलेली वस्तू ही मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळीवरील GPS ट्रॅकर असलेली फ्लोटर/बोया असून ती वाहत वाहत भारतीय पाण्यात आल्याचे भारतीय तटरक्षक दलाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी अशा प्रकारचा बोया 03 जानेवारी 2025 रोजी ओखा, गुजरात येथेही सापडला होता. तरीदेखील, संपूर्ण सागरी पट्ट्यात उच्चस्तरीय गस्त आणि समन्वय सुरूच असून 52 अधिकारी आणि 554 पोलीस कर्मचारी या शोध मोहिमेत कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *