उद्या भारत बंद: २५ कोटींहून अधिक कामगारांचा देशव्यापी संप, बँकिंगसह विविध सेवा ठप्प होण्याची शक्यता

Bharat band
मुंबई : 
देशभरातील 25 कोटींहून अधिक कामगार बुधवारी 9 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारच्या आर्थिक, कामगारविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरोधात देशव्यापी संप करणार आहेत. 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांचे संलग्न गट भारत बंद पुकारणार असून यामुळे देशातील बँकिंग, विमा, कोळसा, टपाल, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
या संपात बँक कर्मचारी संघटनांचाही सहभाग असल्यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सहभागी प्रमुख कामगार संघटना:
  • इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
  • ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC)
  • हिंद मजदूर सभा (HMS)
  • सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)
  • ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (AIUTUC)
  • ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर (TUCC)
  • स्वयंरोजगार महिला संघटना (SEWA)
  • ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (AICCTU)
  • लेबर प्रगतीशील फेडरेशन (LPF)
  • युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस (UTUC)
नागरिकांवर संभाव्य परिणाम:
  • बँकिंग व्यवहारांमध्ये व्यत्यय, चेक क्लिअरिंग व आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता
  • सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम – बसेस, टॅक्सी, अ‍ॅप-आधारित कॅब सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
  • काही भागात निदर्शने, मोर्चे, रस्ता अडथळे – स्थानिक प्रवास आणि मालवाहतूक प्रभावित होण्याचा इशारा
  • रेल्वे सेवांवर अद्याप अधिकृत संप जाहीर नसला, तरी काही भागात विलंब अथवा अडथळ्यांची शक्यता वर्तवली जात आहे
  • शाळा, कॉलेज आणि खाजगी कार्यालये सुरू राहणार, पण वाहतुकीच्या समस्यांमुळे काही भागात अडथळे शक्य
संपाची पार्श्वभूमी:
कामगार संघटनांनी गेल्या वर्षी कामगार मंत्री मनसुख मांडविया यांना 17 कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले होते. परंतु त्यावर केंद्र सरकारने कोणताही ठोस प्रतिसाद न दिल्याचा आरोप करत त्यांनी संपाची हाक दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *