उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुपच्या बांधकाम साईटवर ७ बांगलादेशी घुसखोर आढळून आले. उरण पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली असून, संशयितांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा वावर वाढला आहे. नौदल शस्त्रागार, JNPA बंदर, ONGC, GTPS यांसारख्या संवेदनशील प्रकल्पांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी भाडेकरूंच्या कागदपत्रांची तातडीने तपासणी करून कोंबिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.