अलिबाग बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र जोशी विजयी झाले आहेत. त्यांनी परिवर्तन आघाडीचेअध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र यांचा केवळ 56 मतांनी पराभव केला आहे. तर उपाध्यक्षपदी मानसी म्हात्रे तर खजिनदारपदी अॅड. पुष्कर मोकल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार(दि. ९ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तासाभराने मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान कोण बाजी मारणार, याबाबत वकील वर्गात मोठी उत्सुकता होती. रात्री अडीच वाजेपर्यंत निकालाची प्रतीक्षा कायम होती. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अॅड. सुरेंद्र जोशी आणि परिवर्तन पॅनलचे अॅड. जितेंद्र भगत यांच्यात चुरशीची लढत झाली. महिला उपाध्यक्षपदी अॅड. मानसी म्हात्रे, तर खजिनदारपदी अॅड. पुष्कर मोकल यांची बिनविरोध निवड झाली होती.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अॅड. सुरेंद्र जोशी, उपाध्यक्षपदी अॅड. मानसी म्हात्रे आणि अॅड. अनंत पाटील, सचिवपदी अॅड. राजेंद्र माळी, खजिनदारपदी अॅड. पुष्कर मोकल, तर अंतर्गत हिशेब तपासनीसपदी अॅड. विनोद माळी यांची निवड झाली.
सदस्यपदी अॅड. हितेश पाटील, अॅड. निवास पाटील, अॅड. अझहर घट्टे, अॅड. मिलिंद साळावकर, अॅड. जयमाला पाटील, अॅड. सुलभा पाटील, अॅड. चैताली मगर आणि अॅड. अश्विनी म्हात्रे निवडून आल्या. यापैकी अॅड. हितेश पाटील, अॅड. मिलिंद साळावकर, अॅड. जयमाला पाटील आणि अॅड. सुलभा पाटील हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार होते.
निवडणुकीनंतर उपस्थित बार असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीमुळे अलिबाग बार असोसिएशनमध्ये नव्या कार्यकारिणीच्या कामकाजाबाबत अपेक्षा व्यक्त होत आहेत.