Panvel: तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील पूल बांधकामाला पावसाचा फटका; सेंट्रींगचा मनोरा गेला वाहून, काम रखडण्याची शक्यता

Panvel: तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील पूल बांधकामाला पावसाचा फटका; सेंट्रींगचा मनोरा गेला वाहून, काम रखडण्याची शक्यता
पनवेल :
पनवेल तालुक्यातील वलप गाव ते तळोजा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम सुरू असतानाच सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी गेले. पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराने उभारलेला सेंट्रींगचा मनोरा वाहून गेला. त्यामुळे या पुलाच्या कामात आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वलप गावाशेजारील गणेशनगर परिसरातील जुना पूल धोकादायक झाला होता. त्याऐवजी नवीन पूल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते काशिनाथ पाटील यांनी केला आहे.
सध्या मुसळधार पावसामुळे उभारलेला सेंट्रींगचा मनोरा वाहून गेल्याने काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *