महाडमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक दाखल

महाडमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक दाखल

महाड (मिलिंद माने) :
संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23 जवानांचे एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) पथक काल रात्री उशीरा महाडमध्ये दाखल झाले आहे. मागील काही वर्षांतील आपत्तीचे स्वरूप लक्षात घेता, पावसाळ्यात महाडमध्ये NDRF चे पथक तैनात ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या पथकाने महाड नगर परिषदेच्या दस्तुती नाक्याजवळील रमा विहार येथे आपला कॅम्प उभारला आहे. या पथकाकडे चार फायबर होडी, वायरलेस सेट, आणि इतर अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत.
आगामी काळात एनडीआरएफचे हे पथक महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरप्रवण गावांना भेटी देणार आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेसंदर्भातील जनजागृती व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *