Murud : मिठेखार येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू !

मिठेखार येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू - मुरुड तालुक्यातील घटना
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यात पावसाचा तांडव सुरू असताना मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात आज सकाळी दरड कोसळल्याने दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत ७५ वर्षीय विठाबाई गायकर यांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे गावानजीक डोंगराचा मातीचा ढिगारा घरावर कोसळून भिंत अंगावर पडल्याने हा अपघात घडला.
मिठेखार हा दरड प्रवण ग्रस्त गाव म्हणून प्रशासनाकडून घोषित करण्यात आला असून यापूर्वीही येथे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी सुरक्षा भिंत उभारण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रत्यक्षात ती कामे झालेली नाहीत. ग्रामस्थांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही उपाययोजना न झाल्याचा आरोप केला आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, सरपंच व स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी या भागातील कुटुंबांना कायमस्वरूपी सुरक्षित पुनर्वसनाची मागणी केली आहे. शासन प्रतिनिधी फक्त आश्वासने देतात मात्र ती वेळेवर पूर्ण होत नाहीत, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *