रायगड जिल्ह्यात चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या इशाऱ्या नंतरही जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता आज शाळा महाविद्यालय सुरू ठेवल्याने PEN न्यूज वाहिनीने याची दखल घेत जिल्हा प्रशासन ययाच्याकडून झालेल्या हलगर्जी पणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही अवधीतच जिल्हा प्रशासनाने दिनांक १८ऑगस्ट २०२५रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढत असताना मुंबई व रायगड जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) Red Alert जारी केला आहे. पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत तातडीने निर्णय घेऊन शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून घेतलेला निर्णय पालकांच्या स्वागतास उतरले.
मात्र, रायगड जिल्हा प्रशासनाच्या शांत भूमिकेवर पालक आणि विद्यार्थ्यांचा संताप उसळला होता. याबाबतचे खरे वास्तव PEN न्यूज ने वाहिनीवर प्रसिद्ध करताच अगदी दीड ते दोन तासात रायगड प्रशासन खडबडून जागे झाले त्याच बरोबर अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. अखेर या दबावाला प्रशासन झुकले असून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या मंगळवार दि. 19 ऑगस्ट रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.