Matheran : पथदिव्यांची बत्ती गुल; स्थानिकांसह पर्यटक त्रस्त, प्रशासन सुस्त

Matheran : पथदिव्यांची बत्ती गुल; स्थानिकांसह पर्यटक त्रस्त, प्रशासन सुस्त
कर्जत (गणेश पवार) : 
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये नागरिक आणि पर्यटकांसाठी कार्यरत असलेली मुख्य रस्त्यांसह अंतर्गत मार्गावरील पथदिव्यांची व्यवस्था ही माथेरान गिरिस्थान नगरपरिषदे मार्फत पथदिव्यांचे थकीत वीज बील न भरल्यामुळे महावितरण कडून मुख्य रस्त्यांची वीज पुरवठा खंडित केला असल्यामुळे ठप्प पडली असल्याने, मात्र स्थानिक नागरीकांसह माथेरानमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आंधारमय स्थितीमध्ये रस्त्यांवरून प्रवास करण्याची वेळ आली असल्याने, मात्र माथेरान गिरीस्थान नगरपरिषदे प्रशासनाचा अनागोंदी कारभार हा चव्हाट्यावर आला असुन, याबाबत स्थानिकांकडून नगरपरिषद प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून नागरिकांकडून घरभाडे पट्टीच्या व पर्यटकांकडून प्रवासी कर आकारून कर हा वसूल केला जात आहे. या आकरण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण करांमधून स्थानिक नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा या पुरविल्या जाण्याचे काम हे माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासना केले जात आहे. व शासन नियम व कायदयानुसार ही जबादारी पार पाडणे हे अनिवार्य असताना, मात्र या कराच्या पैशाचा विनियोग हा इतर कामासाठी केला जात असल्यामुळे, माथेरान मधील मूलभूत गरजांकडे नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेने ऑगस्ट महिन्याचे अठ्ठावीस लाख अडतीस हजार एकशेअंशी रुपये पथदिवे वीज बिल हे महावितरणाकडे भरले नसल्याने, दिनांक १७ सप्टेंबर रोजी महावितरण कडून माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेला वीज बिल भरण्याबाबत सूचित केले होते.
 माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत कोणतंही उत्तर आले नसल्याने तसेच वीज बिल भरले नसल्याने माथेरान महावितरणने महात्मा गांधी रोडवरील पथदिव्यांचा वीज पुरवठा पूर्णतः खंडीत केला आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरीकांसह माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना मात्र या काळाकुट्ट अंधारतुन मार्गक्रमण करत आपला अंधारमय प्रवास हा रात्रीचे सुमारास करण्याची वेळ आली असुन, या अंधारमय प्रवासा दरम्यान रस्त्यावरील असलेल्या खड्यांमुळे पाय मुरगळुन इजा होण्याच्या समस्यांचा उपभोग घेण्याची नामुष्की ओढावली आहे.
मागील काही महिन्यांपासून नगरपलिकेकडून जी ई एम पोर्टल वरून लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. कर स्वरूपात आलेला पैसा पालिका गरज नसताना खर्च करत आहे. पण स्थानिक नागरीकांसह येणाऱ्या पर्यटकांच्या मूलभूत गरजा पुरविण्यात पालिका प्रशासन मात्र कमी पडत आहे. माथेरान मधील अधिकारी वर्ग हा आपल्या सरकारी निवासस्थानात राहत नसल्यामुळे येथील लोकांना कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागतो याचे कोणतेही सोयरसुतक मात्र या अधिकारीवर्गाला नसल्यामुळे येथील स्थानिक नागरीकांकडून नाराजी प्रकट करत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
—————————-
माथेरान नगरपलिकेकडून पथदिव्यांची वीज बिल भरणे क्रमप्राप्त असताना वीज बिल भरले जात नाही याला जबाबदार मुख्याधिकारी आणि लेखापाल असून, हे दोघेही शासकीय निवासस्थानात राहत नसून माथेरान शहराच्या बाहेर राहतात. तर मुख्याधिकारी यांची उपस्थिती ही दुपारचे दोनचे सत्रात होत असल्यामुळे येथील लोकांना कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागतो याचे काहीच देणेघेणे नाही. लोकांना अंधारातून चालणे जिकरीचे झाले आहे. त्यात रस्त्यांना खड्डे पडले असल्याने पाय मुरगळुन दुखापत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर हे पथदिवे पूर्ववत करून आम्हाला सेवा दिली नाही तर मोठे जनआंदोलन उभारावे लागेल.
…संतोष कदम, माथेरान शहराध्यक्ष, मनसे.
—————————-
माथेरान मधील एकूण ५१ कनेक्शन असून, त्यातील काही बंद अवस्थेत आहेत, तसेच काही एमएमआरडीए कडील आहेत, त्यामुळे ती बिल नगरपालिकेने का भरावीत. आता दहा लाख एकोणतीस हजाराचा चेक महावितरणला दिला आहे. याबाबत २४ सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावला असता त्यांचा आणि माझा संपर्क होऊ शकला नाही. नाहीतर कालच वीजबिल भरून वीजपुरवठा पूर्ववत झाला असता.
..भारत पाटील, लेखापाल, माथेरान गिरिस्थान नगपरिषद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *