खैरवाडी येथे आदी कर्मय़ोगी सेवा अभियान कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nagotahne khairwadi
सुकेळी (दिनेश ठमके) :
रोहा तालुक्यामध्ये सर्वत्र सुरु असलेल्या आदी कर्मयोगी सेवा अभियानास अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असतांनाच नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल खैरवाडी गावामध्ये कर्मयोगी सेवा धरती आबा योजना शिबिराचे आयोजन मंगळ ( दि.23 ) रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमाला ऐनघर विभागातील नागरीकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल अंतर्गत असलेल्या सर्व आदिवासी वाड्यांच्या विकास कामांंचा आराखडा घेण्यात आला.यामध्ये रस्ता, पाणी, विजेच्या तसेच आदी समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला ‌ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती,कोकळे, उपसरपंच भगवान शिद , सदस्य मनोहरभाई सुटे , किशोर नावळे, विनोद निरगुडे , प्रकाश डोबळे , अर्चना भोसले , प्रज्वली भोईर , वैदेही इंदुलकर, पल्लवी भोईर , सुवर्णा शिद, कल्याणी मोहीते , नकीबाई कोकळे , सविता धामणसे, कृषि विस्तार अधिकारी राखी खोपकर, ग्रामविकास अधिकारी गोविंद शि़द, ग्राममहसुल अधिकारी योगेश वार्डे, सहाय्यक कृषी अधिकारी ऋषिकेश कदम, सुकेळी पोलिस पाटील चैत्राली झोलगे, तामसोली पोलिस पाटील महेश शिरसे, ऐनघर तंटामुक्ती अध्यक्ष जानु वारगुडे, वातावरण संस्थेचे विलास चाळके, अक्षय थोरात, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रदिप कोळी, राहुल ऐलके आदी ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *