BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत; ठाकरे बंधू एकत्र, अजित पवार स्वबळावर

'BMC'मध्ये मोठी भरती; असा करा अर्ज
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३० डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून, देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या सत्तेसाठी होणारा राजकीय रणसंग्राम आता स्पष्ट झाला आहे. २२७ जागांसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत महायुती, ठाकरे बंधू-शरद पवार गट युती, काँग्रेस-वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात चौरंगी लढत रंगणार आहे.
यंदाच्या निवडणुकीतील सर्वात मोठा राजकीय बदल म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच युतीत उतरले आहेत. मराठी मतांचे विभाजन रोखणे आणि ‘ठाकरे’ ब्रँड पुन्हा बळकट करणे हे या युतीसमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ११ जागांवर पाठिंबा दिला आहे.
महायुतीत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात सन्मानजनक जागावाटप झाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना युतीत जागा न मिळाल्याने त्यांनी ९४ जागांवर स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीसमोरच आता अंतर्गत आव्हान उभे राहिले आहे.
दुसरीकडे, अनेक वर्षांनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने दलित व अल्पसंख्याक मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही निवडणूक केवळ महापालिकेतील जागा जिंकण्यापुरती मर्यादित नसून, मुंबईवर कोणाची सत्ता राहणार आणि ‘खरी शिवसेना’ कोणती, याचा फैसला करणारी ठरणार आहे.
पक्षनिहाय अधिकृत जागावाटप:
महायुती
  • भाजप – १३७
  • शिवसेना (एकनाथ शिंदे) – ९०
ठाकरे बंधू–शरद पवार गट युती
  • शिवसेना (UBT) – १६४
  • मनसे – ५३
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ११
काँग्रेस–वंचित आघाडी
  • काँग्रेस – १३९
  • वंचित बहुजन आघाडी – ६२
  • रासप – १०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ९४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *