अजित पवार गटाला धक्का ! उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू

Mira bhayandar candidate
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
मीरा–भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जावेद पठाण (वय ६६) असे मृत उमेदवाराचे नाव असून ते प्रभाग क्रमांक २२ मधून निवडणूक लढवत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास मीरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे मीरा–भाईंदरच्या राजकीय वातावरणात शोककळा पसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच राजकीय पक्षांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मीरा–भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *