सामान शिफ्टिंगच्या बहाण्याने दागिने लंपास करणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

Dukli police arrest man who stole jewellery under the pretext of shifting goods
पनवेल |
पनवेल शहरात घरातील सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सुदर्शन शिंगाडे यांच्या करंजाडे येथील घरातील सामान हे करंजाडे ते नवीन पनवेल तक्का येथे हलविण्याचे काम आरोपी संदीपकुमार जैस्वाल (२४, रा. कांदिवली) व गौरव शुल्का (२८, रा. मालाड) यांना दिले असता त्यांनी कपाटातील डबीत ठेवलेले सोन्याचे अंगठ्या, कानातील रिंग, मणी व देवींची मूर्ती असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
घटनेची माहिती मिळताच सुदर्शन शिंगाडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फडतरे, हवालदार अमोल पाटील, पोलीस शिपाई विशाल दुधे आणि पोलीस नाईक सुभाष राठोड यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल ९० टक्के सोन्याचे दागिने हस्तगत केले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सुभाष राठोड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *