सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक छगन फाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत रजपे हद्दीतील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात तो पार पडला. राज्य शासनाने स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती शाळांमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्व शाळांना त्यांच्या प्रतिमांचेही वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक मूल्येही जोपासावीत, असे आवाहन केले. वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याची छगन फाळे यांची परंपरा परिसरात कौतुकास्पद ठरत असून, हा उपक्रम पुढील काळातही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.