सलग चार दिवस वाहतूक कोंडीत अडकला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग!

Mangav trafic
महाड | मिलिंद माने 
मागील १८ वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम  पूर्णत्वास जात नसल्याने कोकणातील चाकरमानी त्रस्त झाला असून यंदाच्या दिवाळी उत्सवानिमित्त मुंबई व कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना माणगाव जवळ मागील चार दिवसापासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून पाचव्या दिवशी भाऊबीज असल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबलतक रांगा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १८ वर्षापासून चालू असताना अद्याप ते पूर्णत्वास. गेलेले नाही त्यातच चालू वर्षी गणेशोत्सव काळात मागील काही वर्ष खड्ड्यातून प्रवास चाकरमान्यांना करावा लागला तशीच परिस्थिती चालू वर्षी देखील होती दिवाळीच्या सुट्ट्या पडल्याने मुंबईतून कोकणात व कोकणातून मुंबईत सुट्टीसाठी जाणाऱ्या चाकण मान्यांना मात्र मागील चार दिवसापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना माणगाव मध्ये करावा लागत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव मध्ये दोन्ही बाजूकडे दोन दोन किलोमीटरच्या लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्याने माणगाव शहर पार करण्यासाठी वाहन चालकांना तब्बल दीड ते दोन तासाचा अवधी लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र मागील चार दिवसापासून माणगाव परिसरात पाहण्यास मिळत आहे.
पुण्याकडून येणारी व जाणारी वाहने देखील माणगाव शहरातूनच महाड व मुंबईच्या दिशेने जातात त्यातच माणगाव एसटी आगारातून मुंबई व महाड कडे जाणाऱ्या एसटी बसेस ये -जा करीत असल्याने. महाड कडून मुंबई व मुंबई कडून महाड कडे जाणारी वाहने दोन्ही बाजूकडे काही काळ थांबवावी लागत आहेत यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते दिवाळी सणाच्या सुट्ट्या जाहीर झाल्याने मुंबईतून कोकणात व कोकणातून मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने माणगाव माणगाव ते खरवली फाटा मुगवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
पाचव्या दिवशी देखील वाहतूक कोंडी होणार?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवाळीच्या सुट्ट्या पडल्याने चाकरमान्यांबरोबरच पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणावर रेलचेल पाहण्यास मिळत आहे मात्र सलग चार दिवस वाहतूक कोंडीतून त्रस्त झालेल्या चाकरमान्यांना गुरुवारी भाऊबीज निमित्त बहिणीकडे ओवाळण्यासाठी जाणाऱ्या भावांची संख्या देखील मोठी असल्याने पुन्हा एकदा पाचव्या दिवशी देखील माणगाव शहरातून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळेल वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने वाहतूक पोलीस देखील या कामे कमी पडत असल्याचे चित्र या निमित्ताने अधोरेखित होत आहे माणगाव व इंदापूर बायपास चे काम पूर्ण झाल्याशिवाय माणगाव व इंदापूर मधून मुंबई व कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सुटका होणार नाही हे स्पष्टपणे मागील चार दिवसापासून झालेल्या वाहतूक कोंडीच्या पाहणीतून दिसत आहे.
वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेंना
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव व इंदापूर येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ज्याप्रमाणे बसत आहे त्याच पद्धतीने या महामार्गावर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेंना देखील बसत असल्याचे पाहण्यास मिळत असून रुग्णवाहिका देखील एक एक तास वाहतूक कोंडीत अडकत आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एसटी महामंडळाच्या तसेच खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिला वर्गांना तासन्तास वाहनात एकाच जागी बसून राहिल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अनेक महिला व वृद्ध व्यक्ती कमालीचे त्रस्त झाले आहेत या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून आमची सुटका कधी होणार असा सवाल या महामार्गावर प्रवास करणारे चाकरमानी राज्य सरकारला व केंद्र सरकारला विचारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *