कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाने यंदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे जुलै–ऑगस्ट २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या एम.एस्सी. (रसायनशास्त्र) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
या परीक्षेचा निकाल ८०% लागला आहे. महाविद्यालयातर्फे या परीक्षेत भाग घेतलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 🏅 प्रथम क्रमांक – रुपाली डाकी 🥈 द्वितीय क्रमांक – फिरदौस अन्सारी 🥉 तृतीय क्रमांक – श्रेया दिवकर यांनी मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ पाटील, कार्यवाह अॅड. सौ. पल्लवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य नरेंद्र जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिनेश भगत, अंतर्गत मुल्यमापन समिती प्रमुख डॉ. संदेश गुरव, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीष पाटील, आणि पदव्युत्तर विभाग समन्वयक डॉ. विलास जाधवर यांनी अभिनंदन केले.
प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाने सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम ठेवत यशाचा आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.