सुकेळी ( ता .रोहा) येथिल जिंदल रुग्णालयाच्या सौजन्याने बुधवार दि.24 सप्टेंबर 2025 रोजी खांब विभागातील वैजनाथ व घेरासुरगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्रदय तपासणी शिबिरामध्ये एकुण 84 नागरीकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये जिंदल रूग्णालयातील डॉ.प्रिया भोईर यांच्यातर्फे नागरीकांची तपासणी करण्यात आली. तसेच या शिबिरामध्ये नागरीकांची ईसीजी, रक्तदाब, शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून मोफत औषधे देण्यात आली. तसेच पुढील उपचारासाठी डॉ.प्रिया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.