विरजोली येथे अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्राचे खा.सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण

Virjoli phc centre grand opening
कोलाड ( श्याम लोखंडे) : 
रायगड जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तालुक्यातील विरजोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने उभारण्यात आला असून या भव्यदिव्य वास्तूमध्ये अत्याधुनिक,स्वच्छ व सुसज्ज रचना, प्रशिक्षित आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आणि दर्जेदार वैद्यकीय सेवेमुळे येथील स्थानिक नागरिकांना व रुग्णांना आता अधिक सुलभ, वेगवान आणि दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार असून या माध्यमातून ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून यामुळे आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडून येईल असा विश्वास खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
विरजोली येथे सुमारे ७ कोटी रुपये निधी खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे,जेष्ठ नेते जगन्नाथ कुंडे, विरजोली ग्रामपंचायत सरपंच प्रदीप कुंडे, जेष्ठ कार्यकर्ते संजय नाकती, युवा कार्यकर्ते रवींद्र घोसाळकर, मोरेश्वर नाकती, विभागीय अध्यक्ष उदय शेलार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खा.सुनिल तटकरे यांच्याहस्ते फीत कापून आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खा.सुनिल तटकरे म्हणाले की, या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आपल्या भागातील गरीब व वंचित लोकांसाठी आता त्यांच्या दारीच दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचेल. ही भावना व्यक्त करताना मला विशेष आनंद होत असून या भागात होणाऱ्या विविध विकासात्मक कामांमुळे या भागाचा कायापालट होणार असल्याचे दावा खा. सुनिल तटकरे यांनी केला.
फोटो कॅप्शन : विरजोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन प्रसंगी खा. सुनिल तटकरे,ना. अदिती तटकरे,तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर,कार्याध्यक्ष समीर शेडगे,जेष्ठ नेते जगन्नाथ कुंडे,सरपंच प्रदीप कुंडे आदी मान्यवर
तसेच ग्रामस्थांनी दिली ३ एकर जागा मोफत विरजोली या भागात शेकडो गावे वाड्या वसत्या आहेत. पण आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थांचे खूप हाल होत असत. या भागात शासनाने आरोग्य केंद्र सुरु करुन लोकांनाची सेवा करावी या उद्दात हेतूने ग्रामस्थांनी संघटित होऊन या आरोग्य केंद्रासाठी ३ एकर जागा मोफत दिली. या जागेत आज अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्र उभा राहिल्याने ग्रामस्थ वर्गाकडून समाधान व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *