रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस ! कोलाड -आंबेवाडी नाक्यावर पूरपरिस्थि, जनजीवन विस्कळीत

Kolad naka poorstiti
कोलाड (श्याम लोखंडे) :
रायगड जिल्ह्यात गेली तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका महिसदरा या नद्या तुडूंब दुथडी भरून वाहत असून डोंगर दऱ्यातून वाहणारे नाले देखील धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे भरून वाहत असल्याने, मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरिल मार्गावर तसेच बाजारात पुराचे पाणी शिरल्याने या पावसाचा फटका दुकानदार यांना बसला आहे.
मुसळधार पावसाचा थैमान धो -धो मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चौपदरी करण्याच्या भरावाचा तसेच अर्धवड उड्डाण पुलांचे काम त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे केलेले गटारांची कामे याचा मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर कोलाड आंबेवाडी नाक्यावर कै द ग तटकरे चौकात पाणी साचल्याने रोहा कडे येणाऱ्या तसेच मुंबई केक जाणाऱ्या वाहन चालकाना चौकातून वाहने मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर बाजारपेठेतील काही दुकानातून पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे ऐन गणपती सण समोर असताना मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महाराष्ट्र ६६ वरील चौपदरी करणाचे काम गेली पंधरा सोहळा वर्षांपासून सुरु असुन आंबेवाडी नाक्यावरील निस्कृष्ठ दर्जाचे संबंधित ठेकेदारांनी केलेले काम पुन्हा एकदा समोर आले. असुन या नाक्यावरील ठेकेदार यांनी मनमानी बनवलेले गटारवर व रस्ता खाली यामुळे येथे पाणी जाण्यासाठी जागा उरली नाही. याचा नाहक त्रास व्यावसायिकांसह प्रवाशी नागरिक यांना भोगावा लागत आहे.

गणेश उत्सव आठ दिवसावर आला असुन यामुळे आंबेवाडी येथील व्यापारी वर्गानी आपल्या दुकानात माल भरून ठेवला आहे.परंतु दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे पुरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी दुकानात शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार संबंधित ठेकेदार असुन यांनी बनविलेल्या निस्कृष्ठ दर्जाच्या गटारामुळे या बाजारपेठेत पाणी साचून पूर स्थिती निर्माण होत असुन याचा फटका व्यापारी वर्गासहित नागरिकांना भोगावा लागत आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी नागरिक यांच्या कडून व्यक्त करण्यात येत आहे.

==========================
पावसाला सुरू झाल्यापासून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील बाजापेठेत किमान तीन ते चार वेळा पूरपरिस्थितीला कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ व्यावसायिकांना सामोरे जावे लागले आहे तर इतिहासास प्रथमच या नाक्यावर तीन ते चार वेळा पूरपरिस्थि निर्माण झाली याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे तर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या भरावाचा तसेच अर्धवड उड्डाण पूल आणि निकृष्ट दर्जाची गटार लाईनच्या कामांचा फटका अखेर मुसळधार पावसामुळे येथील रहिवासी ग्रामस्थ नागरिक तसेच बाजार पेठेतील छोटे मोठे व्यावसायिक यांना बसल्याने एकच संताप व्यक्त करत ठेकेदार यांच्या विरोधात पुन्हा पोलिस स्टेशन गाठत याबाबत उपस्थित सर्व ग्रामस्थ व्यावसायिक यांनी गाऱ्हाणे मांडले तसेच त्यांना आणि सदरील प्रशासकीय ग्राम पंचायत यांना तातडीने पत्रव्यवहार करण्यात आले. तसेच विभागीय कर्तव्यदश पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी पूरपरिस्थिती नियंत्रण करण्यासाठी तत्काळ उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केले.
…चंद्रकांत लोखंडे, कोलाड आंबेवाडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *