मनी पॉवर, मसल पॉवर आणि पॉवर ऑफ इंटेलिजन्स यामध्ये बुध्दीचे बळच श्रेष्ठ असून अन्य पॉवर्सना नियंत्रित करण्याचे काम अलिकडच्या थिंकटँक पध्दतीच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे. बुध्दीबळ खेळात प्यादे वजीराला जीवंत करू शकते तर राजाला चेक देऊ शकते त्यामुळे 64 घरातील 32 घरांचे रणांगण असलेल्या या बुध्दीबळ खेळाच्या स्पर्धेचे ठिकाण नाही तर आंतरराष्ट्रीय पध्दत ठरवते;खेळाडू कोणत्या दर्जाचे होणार, असा विश्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांनी लोहारे येथील साने गुरूजी माध्यमिक विद्यालयामध्ये आकार प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रॅपिड चेस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी सर्व खेळाडूंच्या मनात निर्माण केला.
याप्रसंगी व्यासपिठावर सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश चव्हाण, आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे, उपाध्यक्ष रामदास सकपाळ, ज्ञानेश्वर सकपाळ, सचिव राजाराम शेलार, खजिनदार रविकांत सकपाळ, सहखजिनदार सुनील चव्हाण, सुरेंद्र दाजी जाधव, अजितकुमार जंगम, विजय दरेकर, लिलाजी शेडगे तसेच विश्वस्त सुखदेव मोरे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुगंधा वाढवळ तसेच सुखदेव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सहभाग शुल्क नसलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील एकूण 96 स्पर्धंकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन अमर सलागरे यांनी केले.
आकार प्रतिष्ठान कापडे बुद्रुक तर्फे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय लोहारे येथे आयोजित करण्यात आलेल्या गतिमान बुध्दिबळ आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे खुला गट प्रथम क्रमांक- शिफा शेख, द्वितीय क्रमांक कशीफ महालूनकर, तृतीय क्रमांक अनादय पाटील, चतुर्थ क्रमांक सुवश वाठोरे, पाचवा क्रमांक सिध्दार्थ चौगुले, सहावा क्रमांक गौतम पवार, सातवा क्रमांक स्वरूप योगी, उत्तेजनार्थ अपेक्षा मारभळ आणि दिलीप पाटील, 15 वर्षाखालील मुले या गटात प्रथम क्रमांक वेदांत मेहता, द्वितीय क्रमांक आयंष्य टेंबे, तृतीय क्रमांक रूद्र जाधव, चौथा क्रमांक शर्व पाटकर, पाचवा क्रमांक प्रथमेश वेल्हाळ, सहावा क्रमांक अर्णव सलागरे, 15 वर्षाखालील मुली या गटात प्रथम क्रमांक आर्या जाधव, द्वितीय क्रमांक आर्या पानसरे द्वितीय क्रमांक भार्गवी नायडू, 11 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक स्वर पटेल द्वितीय क्रमांक आशुतोष कुलकर्णी अकरा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक पूर्वी टेंबे, 15 वर्षाखालील मुले गटात प्रथम क्रमांक राजवीर जाधव, द्वितीय क्रमांक सुधांशू कुमठेकर, तृतीय क्रमांक यश मोरे, चौथा क्रमांक आर्यन कोळेकर, पाचवा क्रमांक मिहिर शेठ, सहावा क्रमांक आर्यन येरुणकर, सातवा क्रमांक विक्रांत मोरे, 15 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांक स्वरूपा महाडिक व द्वितीय क्रमांक संस्कृती भीमाशंकर जाधव, 11 वर्षाखालील मुले गटात प्रथम क्रमांक अर्णव कोळेकर व द्वितीय क्रमांक वेदांत कासार तर 11 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांक समृध्दी जाधव व द्वितीय क्रमांक स्वरा पवार आदींना व्यासपिठावरील मान्यवरांच्याहस्ते ट्रॉफी मेडल्स आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलादपूर तालुक्यात प्रथमच आकार प्रतिष्ठानतर्फे बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यावर मिळालेल्या प्रतिसादामुळे दरवर्षी या स्पर्धांच्या आयोजनाची अपेक्षा स्पर्धकांच्या पालकांनी तसेच स्पर्धकांनीही व्यक्त केली. यावेळी विजय दरेकर, सुरेंद्र दा.जाधव तसेच अन्य मान्यवरांनी विचार मांडले. सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश चव्हाण व आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे यांनी बुध्दीबळ खेळून स्पर्धेचे सकाळी उदघाटन केले.