रायगड पोलीस विभागात मोठा फेरबदल; अधिकारी आणि उपनिरीक्षकांच्या तात्पुरत्या नेमणुकीचे आदेश

अलिबागमध्ये 1.5 कोटींची फसवणूक; आज दोघे दीड कोटींसह जेरबंद, आता पर्यंत पोलिसांसह एकूण 6 जण अटकेत
अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने आदेश क्र.१६९/पशा-१/पो.अधि./पो.अधिकारी/नेमणूक बदल/२०२५ अंतर्गत काही पोलीस अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या तात्पुरत्या नेमणुकीचे आदेश जाहीर केले आहेत. या आदेशानुसार, संबंधित अधिकारी प्रशासनिक कारणास्तव त्यांच्या नावासमोर निर्दिष्ट ठिकाणी तात्पुरते नेमले गेले आहेत.
जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार ही नेमणूक करण्यात आली असून, नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणेकामी अधिकारी तात्काळ कार्यमुक्त केले जातील. आदेशानुसार, कार्यमुक्त करताना अधिकारी त्यांच्या कडे असलेल्या प्रलंबित गुन्हे, अर्ज आणि इतर प्रकरणी कामे लेखी स्वरुपात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करावीत.
– —- —- — — ———– —– —- —- — — ———-
पोलीस अधिकारी यांचे पदनाम व नांव/सध्या नेमणूक ठिकाण/नियुक्ती ठिकाण :
सपोनि/ सुर्यकांत चंद्रकांत पवार- कक्ष/रोहा
पोउपनि/ सुशिल बबन काजरोळकर/महाड शहर/नेरळ
पोउपनि / सुमित कल्लाप्पा खोत/मांडवा/म्हसळा
पोउपनि/नितीन रामनाथ मंडलिक/नेरळ/मांडवा
पोउपनि / अंकुश भागवत सांगळे/पोयनाड /पाली
– —- —- — — ———– —– —- —- — — ———-
सत्र क्र.१२५ अंतर्गत परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचाही तात्पुरता फेरबदल करण्यात आला आहे. उपनिरीक्षकांनी नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होऊन ई-ऑफिसद्वारे अनुपालन अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
सर्व संबंधित प्रभारी अधिकारीही त्यांच्या अधीन असलेल्या अधिकाऱ्यांच्या नवीन नेमणुकीत हजर होण्याची पुष्टी ई-ऑफिसद्वारे तात्काळ सादर करतील, असे आदेशात नमूद आहे.
अलिबागमधील पोलीस प्रशासनातील हा फेरबदल जिल्ह्याच्या सुरक्षा आणि प्रशासन कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी अनुभव मिळेल आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा विभागाने व्यक्त केली आहे.
—- —- — — ———– —– —- —- — — ———–
पोलीस अधिकारी यांचे नांव/नवीन नेमणुकीचे ठिकाण :
पोउपनि/संदीप कचरु फड /रोहा पोलीस ठाणे
मपोउपनि/सत्यभामा यशवंत खरात /श्रीवर्धन पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *