पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दारातच खड्ड्यांचे साम्राज्य! प्रशासनाची डोळे झाक?

Sp office khadda1
अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा ताबा ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच रस्त्याची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग शहरातील हे मुख्य ठिकाण असून, दररोज शेकडो नागरिक विविध कारणांसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात ये-जा करतात. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचारी या दोघांचाही जीव धोक्यात आला आहे. पावसाळ्यानंतर हे खड्डे चिखलाने भरून राहिले असून, अनेकदा दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या तक्रारीही आहेत.
नागरिकांनी याबाबत वारंवार नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही काहीच उपाययोजना झालेली नाही. “एसपी ऑफिससमोरच रस्ता असा असेल, तर इतर भागांची काय अवस्था असेल?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे चित्र पुन्हा एकदा उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *