वरंध घाटात दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू !

वरंधा घाटात दुचाकीचा भीषण अपघात
महाड | मिलिंद माने 
 महाडहून पुण्याकडे जाणाऱ्या वरंध घाटात आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड-पुणे मार्गावर वरंध घाटात एम.एच.४६ आर १३१० या क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन मोटरसायकलचा अपघात झाला. या घटनेत शिवाजी दाजी ढेरे (रा. शेळींब, ता. भोर, जि. पुणे) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घाटातील तीव्र वळण आणि घसरडी सडक यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वरंध घाटातील ही जागा अत्यंत धोकादायक मानली जाते. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *