मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत कोकणात जाणाऱ्या एका वाहनाच्या समोर अचानक एक बैल आडवा आल्याने या वाहनाने ब्रेक मारल्यामुळे पाठीमागील बाजूस असलेली पाच वाहने एकमेकांवर येऊन धडकली यामध्ये तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले.
एक मे असल्याने आणि पुढील दोन दिवस शनिवार रविवार सुट्टी या मुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील दोन दिवस वाहतूक कोंडीने गजबजून गेला आहे. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडतालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत असणाऱ्या पुलावर कोकणात जाणाऱ्या ग्रँड विटारा या कार समोर अचानक एक बैल आडवा आला आता त्या वाहन चालकाने ब्रेक देऊन आपले वाहन थांबवताच मागे असलेली पाच वाहने या कार वर एका मागून एक अशी एकूण या सहा लहाने धडकली या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी ग्रँड विटारा,मागे असलेली किया आणि त्याच्यामागे असलेली दुसरी कार या तीन वाहनांचे नुकसान फार काही झाले नसले तरी त्याच्यामागे असलेली ईरटीका कार क्रमांक एम एच-०५- इ क्यू -७९६९, वॅग्नर कार क्रमांक एम एच एच -०२ -डी एस-०५६९ या तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यात या अपघातानंतर काही काळ वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती मात्रकाही क्षणातच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व वाहने राष्ट्रीय महामार्गावरून बाजूला करण्यात आली. महामार्ग सुरक्षा ग्रस्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे व त्यांच्या पथकांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र यानिमित्ताने पाळीव व मोकाट जनावरांचा प्रश्न महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे