इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवार दि. 02 मे रोजी जाहीर झाला असून नागोठणे येथील 1) को.ए.सो.च्या सरेमल प्रतापमल जैन या जुनीयर कॉलेजच्या यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 97.43 % लागला यामध्ये प्रथम क्रमांक – लायबा इकबाल पानसरे 83.67 %, द्रुतीय क्रमांक – रत्नेश राजेश शिरसे 83.17 %, तृतीय क्रमांक – राहीया जावेद अधिकारी 81.33% गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 90.52 % लागला यामध्ये प्रथम क्रमांक- पायल संतोष गुप्ता 75 %, द्रुतीय क्रमांक – मानसी गणेश फुलारे 74.17%, तृतीय क्रमांक – आर्या भास्कर शिर्के 69.67 % गुण मिळाले आहेत. तसेच कला शाखेचा निकाल 75 % लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक – समीक्षा जगदीश पाटील 78.33 %, द्रुतीय क्रमांक – मनोज काशिराम माडे 75.50 %,तृतीय क्रमांक- प्रवीण गणेश शिद 63.33 % गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे चेअरमन नरेंद्र जैन, मुख्याध्यापक देवीदास पवार, शिक्षक प्रतींनिधी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
2) भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी.परमार कॉलेजचा एकूण निकाल 97 % लागला. त्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक – सौमिली भूनिया 82.33 %,द्रुतीय क्रमांक– रीतविक वुरीती 79.33 %,तृतीय क्रमांक– देवांसी लवटे 77.00 % या विद्यार्थ्यांनी मिळविला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेज चेअरमन किशोर जैन,खजिनदार सुरेश जैन,मुख्याध्यापिका अमृता गायकवाड व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
3) ज. हि. अंबानी विद्यामंदिर या कॉलेजचा विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक -.रुद्र विचारे 74.83 %, द्रुतीय क्रमांक – पूर्वा कुथे 74.67 %, तृतीय क्रमांक –आदेश कोळी 74.17 % या विद्यार्थ्यांनी मिळविला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा समिती,मुख्याध्यापिक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
4) नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू कॉलेजच्या कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक – अंजमा साबीर पिंजारी 52 % , द्रुतीय क्रमांक – मुस्कान नझीर सिपाई 54 %, तृतीय क्रमांक – अबूबकर बालम मुजावर 42 % या विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. तर वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक- नेहा नदीम मुल्ला 65 %, द्रुतीय क्रमांक – सानीला इसहाक शेख 58.67 %, तृतीय क्रमांक – इफ्रा परवीन हारून अंसारी 55.17 % या विद्यार्थ्यांनी मिळवीले आहेत.. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे चेअरमन समद अधिकारी, सेक्रेटरी लियाकत कडवेकर, संचालक शब्बीर अधिकारी,डॉ. सादिया दफेदार तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.