मुंबई-गोवा ‘जम्पिंग झपाक’ महामार्गावर १८ वर्षांची प्रतीक्षा कायम; अपूर्ण काम, टोल वसुली आणि इंदापूर-माणगाव येथे भीषण वाहतूक कोंडीतून सुटका अशक्य? पोलिसांची मात्र दमछाक

महाड | मिलिंद माने 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १८ वर्षापासून चालू असून अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही त्यातच अपूर्ण काम असताना टोल वसुली चालू करण्याचे धोरण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून व रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अवलंबल्याचे जात असतानाच यंदाच्या मे महिन्यात इंदापूर व माणगावमध्ये कोकणकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असून ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग विभागाचे पोलीस व स्थानिक पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १८ वर्षापासून चालू आहे मात्र अद्याप हे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही त्यातच या महामार्गावरून जाताना वाहन चालकांना सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे ‘जम्पिंग झपाक’चा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे पावसाळा जवळ येत असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उड्डाण पुलावर पडलेले खड्डे व खचलेला सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला गेलेले तडे बुजवण्यासाठी हा रस्ता जागोजागी पत्रे लावून बंद केल्याचे चित्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर ते पेण पर्यंत पाहण्यास मिळत आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरकोलाड, कोलेटी, खांब, या ब्रिजची कामे अद्याप प्रलंबित आहेत तर इंदापूर बायपास व माणगाव बायपास चेकाम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे त्याचबरोबर सावित्री नदी जवळील पुलावर पडलेले खड्डे खेड जगबुडी नदीच्या पुलावरून पडलेले खड्डे परशुराम घाटातील अपूर्ण काम चिपळूण ,संगमेश्वर, निवळी , हात खांबा, पाली, लांजा, येथील ब्रिजची कामे देखील अपूर्ण अवस्थेत आहेत तर अनेक ठिकाणी असणाऱ्या सर्विस रोडची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूर्वी जुनी महाकाय वृक्ष तोडण्यात आले. मात्र त्याजागी अद्याप अठरा वर्षात किती वृक्ष लावले व किती जगले याचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे नसल्याने मोठ्या प्रमाणावर या महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम नेमके कधी पूर्ण होणार याबाबत याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन सरकारमधील मंत्र्यांमध्ये परस्परविरोधी दावे केले जात आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सन २०१८ मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम २०१९ मध्ये पूर्ण होईल असे सांगितले त्यानंतर आज २०२६ वर्ष उजाडले मात्र अद्याप मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी २०१८ मध्ये या महामार्गाचे काम २०२० सालापर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले अशोक चव्हाण यांनी २०२० मध्ये या रस्त्याचे काम २०२१ मध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले व कोकणचे सुपुत्र असलेले रवींद्र चव्हाण यांनी २०२२ मध्ये या महामार्गाची पाहणी करताना त्या रस्त्याचे काम कधी गणेशोत्सव तर कधी शिमगा तर कधी मे व कधी डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र आज २०२६साल उजाडले तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.
राज्याचे नव्याने बांधकाम मंत्री झालेले शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करताना मागील वर्षी २०२५ मध्ये हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र मार्च संपला मे महिना संपायला आला तरी या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम २०२३ मध्ये बोलताना सांगितले होते की पूर्ण झाले नाही तर रस्त्यावर उतरेल असे जाहीर केले होते मात्र रस्त्यावर उतरण्याचे सोडाच मात्र त्यांच्यात मतदारसंघातील इंदापूर व माणगाव या बायपासचे काम देखील अद्याप पूर्णत्वास जात नाही व या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तब्बल चार ते पाच तासांचा वार्षिक कोंडीतून सामना करावा लागत आहे मात्र याबाबत विद्यमान खासदार हे प्रशासनाबरोबर बसून या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाही प्रवास करणाऱ्या वाहतूक कोंडीतून अडकलेल्या प्रवाशांच्या तोंडून ऐकण्यास मिळाली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर पासून पनवेल पर्यंत असणाऱ्या उड्डाणपूलांवर मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेले असून अनेक ठिकाणी रस्ते फुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्याची दुरुस्तीकरण्याचे काम या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पावसाळी पूर्वी करण्याचे काम जरी युद्धपातळीवर चालू असले तरी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अनेक ठिकाणी या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना ‘जम्पिंग झपाक’चा सामना करावा लागत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर व माणगाव येथे दररोज होणारी वाहतूक कोंडीचा सामना जसा कोकणात जाणाऱ्या कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे तसाच वाहतूक कोंडीचा सामना राज्य सरकारमधील रायगड जिल्ह्यातील दोन सत्ताधारी मंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सत्ताधारी मंत्री यांना करावा लागत आहे मात्र वाहतूक कोंडीतून तासंतास अडकून देखील कोकणातील मंत्री आमदार व खासदार याबाबत चकार शब्द उच्चारत नसल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने हम करे सो कायदा त्या पद्धतीने काम चालू केल्याने व कामाची गुणवत्ता नसल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे त्याचबरोबर या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी महामार्ग वाहतूक शाखेतील पोलिसांबरोबरच स्थानिक पोलिसांना देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दररोज आठ ते दहा तास महामार्गावर उभे राहून वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करावी लागत असल्याने पोलिसांचे मनोधैर्य देखील त्या वाहतूक कोंडीमुळे खचल्याचे चित्र पाहण्यात मिळत आहे.