माथेरान शारलेट लेक तलावात नवी मुंबईतील तीन तरुण बुडाले

माथेरान शारलेट लेक तलावात नवी मुंबईतील तीन तरुण बुडाले
माथेरान (मुकुंद रांजणे) : 

जागतिक दर्जाचे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माथेरान येथील शारलोट लेक तलावात रविवारी सायंकाळी नवी मुंबईतील तीन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे आणि फिरोज शेख यांचा समावेश आहे.

दहा जणांचा ग्रुप रविवारी कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून माथेरान येथे पर्यटनासाठी आला होता. त्यांनी पिसरनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर शारलोट लेक परिसरात मौजमजा करत असताना ही दुर्घटना घडली. सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास एका तरुणाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी दोन तरुण पाण्यात उतरले. मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही त्यात बुडाले.

सहकाऱ्यांनी स्थानिकांना माहिती दिल्यानंतर तत्काळ माथेरान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री आपतकालीन रेस्क्यू टीम आणि खोपोली येथील गुरुनाथ साठलेकर यांच्या अपघातग्रस्त बचाव टीमला देखील पाचारण करण्यात आले. संयुक्त प्रयत्नांतून रात्रभर शोधमोहीम राबवून अखेर तीघांचे मृतदेह रात्री नऊ वाजता  सापडले. शवविच्छेदनानंतर आज पहाटे तीनच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या दुर्घटनेमुळे माथेरान परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *