महाड नातेखिंड रोडवर भीषण अपघात : एसटी-ट्रक धडकेत दुचाकीस्वार जखमी

Mahad accident
महाड (मिलिंद माने) :
महाड नातेखिंड रोडवर दस्तुरी नाक्याजवळ आज सकाळच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दुचाकीस्वारास अपघात होऊन गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरवली-माणगाव-महाड ही माणगाव आगाराची एसटी बस (MH-14-BT-4906) महाडकडे येत होती. दरम्यान, महाडवरून रायगडकडे जाणाऱ्या एका ट्रक (MH-12-CZ-6618) ला बसने धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की रस्त्याच्या कडेला उभा असलेला दुचाकीस्वार राजू वसंत मांडवकर (वय ३५) याला धक्का बसून तो जखमी झाला.
जखमी मांडवकर यांना तात्काळ महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाड पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *