बेकायदेशीर गुटखा पोलिसांकडून जप्त

Ghutakaa

पनवेल :
भिंगारी परिसरातील एका टपरीवर बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यावर टपरीवर पनवेल शहर पोलिसांनी छापा टाकला यावेळी गुटखा जप्त करण्यात आला आहे.
पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोनि गुन्हे अभिजीत अभंग, पोशि समाधान पाटील, राजपुरे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर हद्दीतील गस्तीवर असताना पोनि अभंग यांना मिळालेल्या माहितीनुसार ओएनजीसी कंपनीच्या गेटच्या बाजूला असणाऱ्या किरणा माल विक्रीच्या दुकानामध्ये एक इसम गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने दुकानामध्ये छापा टाकून तेथील माल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *