बकरी चारणाऱ्या महिलेला पाठीमागून झडप घालून जबरदस्तीचा प्रयत्न – रोहा तालुक्यात संतापजनक प्रकार

Rape
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहा तालुक्यातील ताम्हणशेत येथील आदिवासी वाडीत राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेसोबत बकरी चारण्याच्या बहाण्याने गेलेल्या एका परगावच्या तरुणाने जबरदस्तीचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पीडित महिलेने रोहा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रवि (पूर्ण नाव माहिती नाही), रा. ताम्हणशेत, ता. रोहा, जि. रायगड, असे आरोपीचे नाव आहे असे समजते.
३ जुलै २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता पीडित महिला बकऱ्या चारण्यासाठी गावाजवळील माळरानावर गेली होती. त्याठिकाणी आरोपी रवी अचानक आला आणि अश्लील शब्द वापरत महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेस मिठी मारून खाली पाडले व कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तोंड दाबून मारहाणही केली.
महिलेने आरडाओरडा करत विरोध केल्याने आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकारात महिला जखमी झाली असून तिने औषधोपचार घेतल्यानंतर आपल्या बहिणीकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर ४ जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीनुसार, रोहा पोलिसांनी गु.र.नं. १३७/२०२५ खाली भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६, ११५(२) नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *