पोलादपूरमध्ये गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलादपूरमध्ये गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड
पोलादपूर | शैलेश पालकर
तालुक्यातील विविध या गोवा बनावटीच्या मद्यासाठी कुख्यात गावासह कापडे बुद्रुक येथेही तब्बल तीन लाखांच्या गोवा बनावटीच्या दारुसाठ्यासह दोघांना अटक करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने यश मिळवले आहे. या छाप्यावेळी एक आरोपी गुंगारा देऊन फरारी होण्यात यशस्वी झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाकडून पोलादपूर तालुक्यातील दिविल व कापडे बुद्रुक गावात गोवा बनावटीच्या मद्याचे अंदाजे तीन लक्ष रुपयांचे बॉक्स जप्त केले. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरारी आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये तसेच संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि रायगडचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क त्याचे महाडचे निरीक्षक व अलिबागचे निरीक्षक व अलिबाग येथील भरारी पथक यांच्या संयुक्त मोहिमेत पोलादपूर तालुक्यातील दिविल व कापडे बुद्रुक गावात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून विदेशी मद्याचे २४बॉक्स व देशी मद्याचे गोवा बनावटीचे १५ बॉक्स जप्त केले अंदाजे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या महाड येथील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गोवा बनावटीच्या विदेशी मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपी विकास कदम व होय योगेश चीनकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून एक आरोपी अद्याप फरारी असल्याचे महाड येथील कार्यालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क खात्याने गोवा बनावटीच्या मुद्देमालाची जप्तीची कारवाई केली. या कारवाईत महाडचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक संतोष पिसाळ, अलिबागचे दुय्यम निरीक्षक बालाजी कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक, मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे, आशिष कांबळे, सुनील घन, प्रशांत नवले, रंजीत माकोडे या राज्य उत्पादन खात्याच्या जवानांनी तर रचना मोहिते या महिला जवान व चालक रिकेश घुले तर शांतिनाथ पाटील या जवानांनी या राज्य उत्पादन शुल्क त्याच्या गोवा बनावटीच्या धाडसत्रात सहभाग घेतला.
गोवा बनवतीच्या दारू विक्री प्रकरणात शुक्रवारी झालेल्या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणावर महाड व पोलादपूर तालुक्यात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा विक्रीला येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पहिल्यांदाच समजून आले असल्याचे प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, दिविल गावातील गोवा बनावटीचा मद्यसाठा बाळगणाऱ्या आणि तस्करीसह अवैध वाहतूक करणाऱ्या एका माफियाने गोवा राज्यातील खटल्यात स्वतःचा मृत्यूचा दाखला सादर करून त्याचा मद्यतस्करीचा धंदा अव्याहत सुरू ठेवला असल्यानेच या गावात सातत्याने अवैध मद्यविक्री व दारू साठ्यांवर धाडीच्या घटनांचे सातत्य दिसून येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.