पेणच्या नलिनी म्हात्रे यांना धडक देऊन मृत्यूस करणीभूत ठरलेल्या चालकाच्या वडखळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Police have arrested the driver who hit and killed Nalini Mhatre of Pen and caused her death
PEN न्यूज ऑनलाइन टीम |
दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर मौजे डोलवी गावाजवळील पुलावर एक भीषण अपघात झाला. या घटनेत पेण येथील नलिनी प्रविण म्हात्रे (वय 47, रा. सागर सोसायटी, पेण) आपल्या ज्यूपिटर स्कूटी (MH-06-BT-1852) वरून वडखळकडून कोलाडकडे जात असताना, अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेचा तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. योगिता सांगळे यांनी हाती घेतला. तपासादरम्यान परिसरातील अनेक CCTV फूटेज तपासून TATA ट्रक (क्र. RJ19/GK5334) हेच अपघातातील वाहन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित ट्रक चालक सुनील विशानोई (वय 37) याने निष्काळजीपणे वेगात वाहन चालवून नलिनी म्हात्रे यांना धडक दिल्याने मृत्यूस करणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यास वाहनासह ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघातातील सर्व पुरावे संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पेण व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *