रायगड जिल्ह्यातील पेण येथील स्वयम् नेचरो थेरेपी सेंटर, येथील सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट अजय शिवाजी मोकल यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ” महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026 ” प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार रविवार, दि. 19 जुलै 2026 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ॲक्युपंक्चर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, रुग्णसेवा आणि समाजोपयोगी योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.
या सोहळ्यास महाराष्ट्रभरातील ॲक्युपंक्चर थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते सुयोग गोऱ्हे , ॲड. नाझेर काझी साहेब (प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ॲड. दत्तात्रय जाधव व ॲड. नागेश सोनुने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश कराळे होते. यावेळी डॉ. नितीनराजे पाटील (व्हाईस चेअरमन, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन), राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघूळदे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अजय शिवाजी मोकल यांना प्राप्त झालेला हा “महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026” त्यांच्या ॲक्युपंक्चर वैद्यकीय व सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात असून, या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.