पनवेल परिसरात रिक्षा चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एकूण १ लाख रुपये किमतीच्या दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
पटवर्धन हॉस्पिटल समोरील रोडवर तसेच परिसरातील इतर भागांमध्ये उभी केलेल्या रिक्षा चोरून आरोपी अक्षय चव्हाण (वय २२, रा. पनवेल) हा पसार झाला होता. यासंदर्भातील तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला शोधून काढले.
आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या दोन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.