खालापूर ग्रामपंचायत अधिकारी युनियन अध्यक्षपदी ‘प्रविण पेमारे’

चौक | अर्जुन कदम
ग्रामपंचायत अधिकारी युनियन(DNE 136) खालापूर तालुका अध्यक्षपदी प्रवीण पेमारे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ग्रामपंचायत अधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या बैठकीत ही निवड एक मताने झाली.
मागील कार्यकारिणीची मुदत संपल्याने रायगड जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपाध्यक्ष पदी प्रमोद काळे, सचिवपदी महेश म्हसे,खजिनदारपदी गोकुळदास राठोड, महिला उपाध्यक्ष स्नेहल घोसाळकर,संघटक संदीप धारणे,प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुरज मुकादम,सहसचिव संतोष पवार, कायदेशीर सल्लागार परिष नांगरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
युनियन च्या ध्येयधोरण राबवून ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी कार्य केले जाईल,असे नवनियुक्त अध्यक्ष प्रविण पेमारे यांनी सांगितले.