रोहा तालुक्यातील खांब विभागात इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा वेल्फेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मागील तीन दिवस शाळेत तिरंगा दिवस साजरा करण्यात आला तर संपूर्ण शाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान विज्ञान प्रतिकलाकृती साकारून रंगी बेरंगी फुलांची सजावटीत उजळून निघाली होती.
खांब विभागातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणप्रेमी महाराष्ट्र विद्युत महामंडळ क्षेत्रातून सेवा निवृत तसेच खांब पंचक्रोशीतील कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या शुभहस्ते या शाळेचा ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे, हभप नारायण महाराज लोखंडे,संचालक डॉ श्याम भाऊ लोखंडे, दिलीप मोहिते,पालक तुकाराम कोंडे, संतोष महाडिक, गणेश कोस्तेकर, प्रदीप मरवडे, सचिन गोळे, विक्रांत गुरव, सूर्यकांत पोटफोडे,अमित भोईर, प्रवीण पोटफोडे, हरिश्चंद्र लोखंडे, महेंद्र वाघमारे,आरती तुपकर, प्रकाश कोकाटे, अर्चना परबळकर, माधवी चितळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे,शिक्षिका सोनाली शिंदे,रुपाली मरवडे , प्रियांका चिकने,प्रतीक्षा धामणसे,सायली म्हात्रे, जान्हवी महाडिक, दर्शना धनवी क्रिडा शिक्षक ज्ञानेश्वर महाडिक, निलेश टवळे, श्रुती वाजे,आदी विद्यार्थी शिक्षक पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
१५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर विविध गीत तसेच पथ नाट्य आणि देश स्वातंत्र्य काळात ज्या ज्या हुत्म्यानी देशासाठी बलिदान दिले अशा थोरविरांद्दलची महती पटवून दिली तसेच पालक संतोष महाडिक, संस्थेचे संचालक डॉ श्यामभाऊ लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे, प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर लाभलेले प्रमूख पाहुणे यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, खांब सारख्या ग्रामीण भागात येथील मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी रविंद्र लोखंडे आणि रिया यांनी शाळा काढून येथील विद्यार्थी वर्गाला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत तसेच इवलेसे लावलेले रोप आणि त्याचा वेणु म्हणजेच झाडाच्या फांद्या पसरून त्याचा वटवृक्षात रूपांतर होत असल्याचा आनंद व्यक्त केला.
विज्ञानाच्या युगात शिक्षण हे महत्वाचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी केलेली भाषण तसेच विविध वेशभूषेत सादर केलेली कला त्याच बरोबर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या विविध ज्ञान विज्ञानवर साकारण्यात आलेल्या कलाकृती ध्वजारोहण प्रसंगी दिलेली परीटहिट आणि मानवंदना याचे कौतुक करत शाळेच्या कार्याची प्रशांशना केली.
संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांनी सांगितले की शाळेत शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची कला क्रीडा तसेच भारतीय संस्कृतीला आधारित नावान्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची मौलिक कामगिरी केली आहे. रस्यस्तरील संपन्न झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत या विद्यायातील केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान पत्र आणि चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर मोठया उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी भक्ती चितळकर,आणि स्वरा धामणसे यांनी केले.