कोण आला रे….कोण आला …. शिवसेनेचा वाघ आला … नागोठणे नगरीत शिवसेनेची निघाली भगवी मिरवणूक

नागोठणे नगरीत शिवसेनेची निघाली भगवी मिरवणूक
नागोठणे | महेंद्र माने
नागोठणे जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित काते यांचा 5146 मतांनी विजय मिळविला तसेच 78 सुकेळी पंचायत समिती गण मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उमेदवार अरुणा हंबीर या 296 मताने विजयी झाल्याने त्यांची नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून शहरातून वाजत गाजत भगवी मिरवणूक काढण्यात आली.
सुमित काते व अरुणा हंबीर यांचे नागोठणे नगरीत आगमन झाल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर निघालेली भगवी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ,खुमाचा नाका,संपूर्ण मोहल्ला,के एम जी विभाग,गांधी चौक मार्गे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन संपूर्ण शहरात फिरविण्यात आली.
यावेळी मनोज खांडेकर,कृष्णा धामणे, गणपत म्हात्रे, बाळू रटाटे,नाझीम नालखंडे,निलोफर पानसरे, शबाना मुल्ला, शहनाज अधिकारी, अजय दळवी,प्रकाश मोरे, चेतन कामथे, दिनेश घाग,प्रवीण ताडकर, इम्रान पानसरे,सोहेल पानसरे, नितीन पत्की, राजेश सुर्वे, अजय पत्की संतोष चितळकर, अविनाश भोसले, अशफाक पानसरे, जितू कजबजे, संजय पिंपळे,विनोद धामणे,मंजर जुईकर, सद्दाम दफेदार, रमिज दफेदार, संजय नांगरे, प्रवीण चितळे यांच्यासह विभागातील परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते