कर्जत तालुक्यात मनसे पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांची शाखा भेट व आढावा बैठक !

कर्जत | गणेश पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हयात नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रामचंद्र बाळा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा निरीक्षक संदीप देशपांडे, योगेश परुळेकर आणि राजेश येरूनकर यांच्या उपस्थितीत पक्ष वाढीसाठी जिल्हयात गाव शाखा भेटी व चर्चासत्र बैठकी घेण्यात येत असल्यानुसार कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गणातील विविध शाखांना भेट व बैठकीचा दौरा पार पडला आहे.
या शाखा भेटीदरम्यान कर्जत तालुक्यातील कशेळे जिल्हा परिषद गाणासह तालुक्यातील मांडवणे, पाली, हेदवली, पोटल, आंबोट, वैजनाथ आणि भालिवडी येथील शाखा अध्यक्ष तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील हजारे नगर शाखा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शाखा अध्यक्षांसह त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत बैठकीतून त्या भागातील समस्यांवर चर्चासत्राच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. तर आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही जिल्हा नेतृत्वाकडून देण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष अभिजित घरत, तालुका अध्यक्ष यशवंत भवारे, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे, माजी चौक उपतालुका अध्यक्ष सागर भोईर, पंचायत समिती विभाग अध्यक्ष शैलेश सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष प्रशांत हुलावले, कैलाश हाबळे, मंगेश दाभाडे, दर्शत लोट, रमेश जोशी, प्रवीण जोशी, आकाश जोशी, किरण मसने, वेदांत हाबळे, कोहिनूर हाबळे, वैभव गुरव, भालचंद्र खंडागळे, सतिश जाधव, हर्षद खंडवी, कुंडलिक सोळसे आणि प्रमोद गायकवाड आदींचीही उपस्थिती होती.