‘SBI’ मध्ये भरघोस पगारची मोठी भरती

SBI मध्ये ऑफिसर पदांची मेगा भरती सुरु !
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे निवड होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळू शकते.
या भरती प्रक्रियेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – १२ पदे, डेप्युटी मॅनेजर – ४३ पदे आणि डेप्युटी मॅनेजर – ६१ पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी १५ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
शैक्षणिक पात्रता
  • तांत्रिक पदांसाठी: संबंधित विषयात B.E./B.Tech किंवा संगणक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी आवश्यक.
  • फायनान्स/क्रेडिट पदांसाठी: CA, ICWA किंवा MBA पदवीधारक उमेदवार पात्र.
वयोमर्यादा
किमान वय २३ ते २५ वर्षे, तर कमाल वय ३५ ते ४२ वर्षे (पदनिहाय). राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
प्रथम अर्जांची छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
अर्ज शुल्क
  • सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी – ₹७५०/-
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी – कोणतेही शुल्क नाही
शुल्क ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.