संपूर्ण रायगड सोमवार दि. २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह मोसमी पावसाने विजांच्या कडकडासह पाच ते सहा तास जोरदार सुरुवात केली आणि होत्याचे नव्हते केले.? जोरदार पडलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या बाजूनी जाणाऱ्या महिसदरा नदीला पूर आले आणि पुराचे पाणी शेतात शिरले. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या २५ पोती कांदयाच्या वाहून गेल्याने येथील शेतकऱ्याचे २३ रुपयाचे मोठे नुकसान झाले असुन याचा त्वरित पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.
या अगोदर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने सुरवात केली. परंतु आज पाऊस जाईल उद्या जाईल या हेतूने अनेक शेतकऱ्यांनी आपली कामे थांबवली पण पाऊस काही कमी होईना? मे महिन्याच्या शेवट पर्यंत एवढा पाऊस आयुष्यात केव्हा ही पाऊस पडलेला नसल्याचे मत जुन्या पिढीतील लोकांनी व्यक्त केले.
तालुक्यातील गोवे येथील शेतकरी अंकुश बापूराव म्हानवर हे गेली तीन चार वर्षांपासून अडीच एकर शेती मध्ये कांदयाचे पिक घेत आहेत. उत्तम आलेले कांद्याच्या पिकाला मोठी मागणी असते म्हणून हा कांदा सुकवून चांगला भाव मिळेल म्हणून शेतात ठेवण्यात आला परंतु निसर्गाच्या कोपामुळे तुफान पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात हा कांदा वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
महिसदरा नदीला अनेक ठिकाणी खांडी गेल्या आहेत. यामुळे नदी दुथडी भरून वाहु लागली तर या खांडीतून दरवर्षी भातशेती पाणी घुसून भात शेतीचे मोठे नुकसान होते याविषयी कोलाड पाटबंधारे खाते यांना वेळोवेळी अर्ज दिल्यानंतर.थातूर मातुर कामे केली गेली. परंतु अनेक ठिकाणी अद्याप ही नदीला खांडी गेलेल्या आहेत.यामुळे पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांची सुटका झाली नाही.परिणामी येथील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
———————————–
खरा पावसाळा ७ जुन महिन्यानंतर सुरु होतो. यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत शेतकरी कामे उरकून उत्पादन केलेला माल विक्रीसाठी बाजारात नेतो. मालाची किंमत चांगली येते या हेतूने माल शेतात साठवून ठेवण्यात आला.परंतु साठवून ठेवलेला माल निसर्गाच्या कोपामुळे क्षणात वाहून गेल्याने नुकसान भरपाई मिळावी.