नवरात्रौत्सवातील दांडिया आणि गरबा खेळांवर यंदा पावसाचे जबरदस्त सावट दिसत आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी भक्तांचा आणि उत्साही तरुणाईचा हिरमूड झाला आहे. रायगड जिल्ह्यासह राज्यभरात परतीच्या मान्सूनमुळे नवरात्रीच्या काळात मुसळधार पावसाचा अनुभव येत असून, रोहा तालुक्यातील कोलाड, खांब, देवकान्हे विविध जिल्ह्यांत आयोजिले जाणारे मोठे दांडिया, गरबा तसेच काही मनोरंजनाचे विविध कार्यक्रम पावसामुळे बाधित झाले आहेत. दांडिया खेळावर पावसाचा परिणाम पावसामुळे अनेक ठीक ठिकाणी तसेच आयोजित करण्यात आलेल्या मैदानांवर पाणी साचले असून चिखलमय प्रांगण झाले आहे, काही ठिकाणी दांडिया-गरबा कार्यक्रम रद्द किंवा कमी प्रमाणात होण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी आणि रविवारी रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवार मंगळवार या दिवशी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनदेखील सतर्क झाले असून सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाची सततधार सुरू झाली आणि शनिवारी रविवारी मुसळधार धो धो मुसळधार पावसामुळे काही भागांत पाणी भातशेतीत पाणी साचले सुरू पावसामुळे उशिरा येणाऱ्या भातपीकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी पूर्ण वाढ झालेल्या रोपांतून लोब्या बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे तर काही धान कापणीला आला आहे तसेच भातशेतांमध्ये पाणी साचल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऐन नवरात्रौत्सवात पावसाचे संकट असल्याने लहान थोरांचे या उत्सवात आनंद लुटण्यात हिरमुड होत आहे.तर आयोजक आणि नागरिकांनी पावसाचा सामना करत छत्र्यांचा आधार, शेड किंवा पेंडॉल बसवून काही ठिकाणी कार्यक्रम चालू ठेवला. मुसळधार पावसामुळे नवरात्रीच्या सणात अडथळे आले, मात्र भक्तांचा उत्साह कायम आहे; अनेकांनी भिजत-चिंब होत गरबा आणि दांडियाचा आनंद घेत आहेत असा आनंदाचा उत्सव आहे.
नवरात्रौत्सवात बदल आणि चैतन्यहवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे,त्यामुळे उत्सवांच्या आयोजनात बदल आवश्यक झाला आहे.काही शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन गरबा खेळण्याची वेळ वाढवली आहे, पावसामुळे एकूणच ठीक ठिकाणी तसेच रोहा तालुक्यात दांडिया-गरबा खेळावर पावसाची घुटमळ असली तरी, भक्ती आणि सांस्कृतिक उत्साहात नागरिक सहभागी होत असून धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंदिर आणि काही सभागृहात पार पडत आहेत.
“गावागावातील तसेच भावकीचे कुलदैवत, गावचे ग्राम दैवत देवीची आराधना आणि नवरात्रौत्सवाचा आनंद पावसामुळे थांबू शकत नाही” अशी भावना अनेक ठिकाणी व्यक्त झाली आहे. तर तरुणाईने पावसाच्या सरी अंगावर घेत उत्साहाने भाग घेत हा उत्साह पावसात भक्तीच्या रसात तल्लीन होऊन वाढवत आहेत तसेच महिलांनी पारंपरिक पोशाखात कार्यक्रमांची शोभा वाढवली आहे. अनेक ठिकाणी महिला पारंपारिक पद्धतीने नाच गाणे कार्यक्रमाच्या स्वरूपात करत आहेत.
नवरात्रीमध्ये दांडिया खेळाच्या जल्लोषावर पावसाची काळी छाया असली तरी भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक रंगत अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. तर भक्तीची रंगत म्हणून आध्यात्मिक विचारांची सांगड म्हणून हरिपाठ,भजन,जागर करत हा उत्सव पावसामुळे साजरा करत आहेत.