Poladpur : सुंदरराव मोरे महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांना सुधा सितारा शिष्यवृत्ती

पोलादपूर | शैलेश पालकर
शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांना सुधा सितारा शिष्यवृत्तीचे वितरण रोहा येथील कार्यक्रमामध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रोहा नगरपरिषद अध्यक्षा वनश्री शेडगे तसेच सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ग्लोबल प्रमुख व सीईओ शिवलिका राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुंदरराव मोरे महाविद्यालयातील एकूण 17 विद्यार्थ्यांना 1 लाख 41 हजार 36 रुपयांच्या शिष्यवृत्तीचे शैक्षणिक वर्ष 2025-26साठी वितरण करण्यात आले. सुदर्शन केमिकल्स लिमिटेड या कंपनीकडून सुधा सितारा या नावाने समाजातील हुशार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने दरवर्षी रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
यावर्षी सुंदरराव मोरे महाविद्यालयातील अक्षदा मारुती देशमुख, अंतरा विजय जाधव, बासीद बशीर धामणकर,भक्ती नरेश सकपाळ, फहरीन फारुक धामणकर, कमल किशोर वरणकर, ॠषिकेश संतोष जाधव, साहिल अनिल पालकर, संपत्ती शशिकांत चिकणे, सानिका अरविंद शिंदे, स्नेहल संतोष जाधव, सुहास दिनेश म्हस्के, सुरभी अजित पवार, तन्वी नितीन पालकर, वेदिका विजय  शिंदे, विशाखा विलास नलावडे, यशस्वी संदेश मोरे या 17 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
यासाठी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख डॉ. नाथिराम राठोड व डॉ.स्नेहल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापासून ते ऑॅनलाईन परीक्षेपर्यंत बहुमोल मार्गदर्शन केले. सुदर्शन केमिकल्स लिमिटेडच्या, महाड शाखेतील फिल्ड ऑॅफिसर दिशांत ढहाणे यांचे विशेष सहकार्य शिष्यवृत्ती मिळणेकामी लाभले. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष ऍड. संतोष काळे, उपाध्यक्ष ऍड. विनोद देशमुख सचिव अशोकबंधू देशमुख, खजिनदार किशोर मोरे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदींनी कौतुक केले आहे.