PEN : तरणखोप येथे आढळला अनोळखी इसमचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचं आवाहन

Pen dead body
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील मौजे तरणखोप येथे एका अनोळखी पुरुषाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.  
पोलिसांकडून मिळालेलेल्या माहितीनुसार, तरणखोप ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला सदर इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. ग्रामपंचायतीच्या सरपंच  दर्शना दिनेश पाटील यांनी ही बाब तात्काळ पेण पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळवली. त्यानंतर पोलिसांनी त्या इसमास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पेण येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी १० वाजता त्यास मृत घोषित केले.
सदर मृत इसम हा पुरुष जातीचा असून त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, उंची सुमारे ५.२ फूट, अंगकाठी सडपातळ आणि चेहरा गोल आहे. त्याला काळी व पांढरी वाढलेली दाढी असून उजव्या हातात हिरव्या रंगाचा फ्रेंडशिप बँड व डाव्या हातात पांढऱ्या धातूचे कडे आढळून आले आहेत. सदर इसमाजवळ कोणतेही ओळखपत्र आढळून आलेले नाही.
मृत्यूचे नेमके कारण तसेच मृत इसमाची ओळख व नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर वर्णनाशी जुळणाऱ्या व्यक्तीबाबत कोणास माहिती असल्यास पेण पोलीस ठाणे (दूरध्वनी: ०२१४३-२५२०६६) किंवा तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घोलप (मो. ९३२५२४१४७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
उन्हाळी सुट्टीत MS-CIT करण्यासाठी पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल कम्प्युटर एक उत्तम पर्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *