मुंबई-गोवा महामार्गांवर तीन चार दिवस सतत पडलेल्या तुफान पावसाच्या विश्रांती नंतर रस्त्यावरील पाणी कमी झाले असले तरी या महामार्गावर पडलेले खड्डे हे कमी होतांना दिसत नाही.यामुळे यावर्षी गणपती उत्सवा साठी गावाला जाणाऱ्या चाकरमानी यांचा प्रवास खड्ड्यातुमचं! महामार्गाच्या कामासाठी करोडो रुपये खर्च करून महामार्गाचे काम जैसे थे! अशीच आहे.यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवर सतत तीन चार दिवस पडलेल्या पावसामुळे पाण्यातून प्रवास करावा लागला होता. परंतु पावसाच्या विश्रांती नंतर आता या महामार्गांरील रस्त्याची चालण झाली असुन रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी या महामार्गाची अवस्था झाली आहे.यामुळे या महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसहित प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील तिसे, तळवली आंबेवाडी बाजारपेठेत कुंडलिका नदीवरील पुल,खांब ते नागोठणे पर्यंत रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असुन यातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गणेश उत्सवाला फक्त पाच दिवस राहिले असुन या उत्सवासाठी लाखो चाकरमानी आपल्या गावाला कोकणात येत असतात परंतु रस्त्याला पडलेल्या प्रचंड मोठया खड्ड्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणे धोकादायक झाले असून या महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल? परंतु या महामार्गांवरील खड्डे दोन दिवसात भरण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पाहून खलील भजन सुचत आहे
जिकडे तिकडे चहुकडे हायवेवर खड्डे पडले l
गावाला जातांना गाडी हाले डुळे ll
गणराया गावाला मी येऊ कसे l
कोकण रेल्वे चे तिकीट न मिळे ll
याप्रमाणे भजना प्रमाणे गावाला येणाऱ्या चाकरमानी यांची अवस्था होणार आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला १८ वर्षे पूर्ण झाली किती ठेकेदार आले किती गेले तरी या महामार्गाचे काम काय पूर्ण होईना?काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. परंतु तेही निस्कृष्ठ दर्जाचे याला मुख्य कारण शासनाचे नसणारे ठेकेदारावर वचक परंतु यामुळे प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे यातून सुटका होण्यासाठी मुंबई -गोवा हायवे वरील दोन दिवसात खड्डे भरण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.