Ladaki bahin Yojana: E-KYC बाबत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Ladaki bahin Yojana: E-KYC बाबत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये थेट सन्मान निधी जमा होणार आहे, असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सांगितले.
आदिती तटकरे यांनी म्हटले की, “महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्याचा सन्मान निधी वितरणात अडथळा येणार नाही. या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.

Aditi tweet

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *